प्रारंभी टेलिफोनची जागा घेणाऱ्या मोबाईल फोनने स्वतः अनेक बदल घडविले. सुरवातीच्या काळात केवळ छोटासा डब्बा असणारा मोबाईल मल्टिमीडियामध्ये रूपांतरित झाला. त्याआधी मोबाईल फोन महागडे असल्याने श्रीमंत आणि व्यवसायकच वापरायचे. तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि मोबाईल फोन लहान आणि स्वस्त झाले. हा साधा फोन स्मार्टफोनमध्ये बदलला आणि जगात क्रांती घडली. दैनदिन वापरातील अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि साधनांची जागा या स्मार्टफोनने घेतली. त्यामुळे काही वस्तू पूर्णपणे बंद झाल्यात नाहीत. परंतु, तर काहींचा वापर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. यात घड्याळे, कॅल्क्युलेटर, कॅमेरे, टीव्ही, टॉर्च, आणि बरेच काही समाविष्ट आहे. स्मार्टफोनची अनेक वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता यामुळे लोकांना या उपकरणांची गरज कमी भासू लागली आहे.
पूर्वी प्रत्येकाच्या मनगटावर घड्याळ दिसायची. स्मार्टफोनमध्ये अंतर्भूत असलेल्या घड्याळामुळे पारंपारिक घड्याळ्यांची मागणी कमी झाली आहे. स्मार्टवॉच सारख्या अत्याधुनिक घड्याळ्यांनी अलार्म, कॅलेंडर आणि फिटनेस ट्रॅकिंग सारख्या अनेक कार्ये घड्याळांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पार पाडली आहेत. स्मार्टफोनमध्ये अंतर्भूत असलेल्या कॅल्क्युलेटर ऍप्समुळे हातातील गणकयंत्रांची मागणी कमी झाली आहे. स्मार्टफोनमधील उच्च-गुणवत्तेच्या कॅमेऱ्यांमुळे स्वतंत्र कॅमेऱ्यांची मागणी कमी झाली आहे. स्मार्टफोन कॅमेरे अनेकदा अधिक कार्यक्षम असतात आणि फोटो आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी उपयोगी पडू लागली आहेत.
स्मार्टफोन आणि स्ट्रीमिंग सेवांमुळे लोकांनी टीव्ही पाहण्याचा वेळ कमी केला आहे. लोक आता त्यांच्या स्मार्टफोनवर टीव्ही शो, चित्रपट आणि इतर मनोरंजक कार्यक्रम युट्युब किंवा अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहता येतात. त्यामुळे टीव्ही बघणाऱ्यांची संख्या घटली आहे. पूर्वी अनेक गावात वीज पुरवठा नव्हता. तेव्हा दिवा, कंदील आणि बदलल्या काळानुसार बॅटरीटॉर्च, चार्जिंग टॉर्चचा वापर झाला. मात्र, आता स्मार्टफोनमधील एलएडी फ्लॅशलाइट्समुळे स्वतंत्र टॉर्चलाइटची मागणी कमी झाली आहे. अनेकदा घरातील लाईट गेली की स्मार्टफोन टॉर्चलाइट सर्वाधिक वापरला जातो.
मोबाईल आल्यापासून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि साधनेच नाहीतर पोस्ट कार्यालये आणि बँकेतील गर्दी देखील कमी झाली आहे. स्मार्टफोन बँकिंग ऍप्समुळे आता बँकेत जाण्याची गरज नाही. लोक आता त्यांच्या स्मार्टफोनद्वारे पैसे जमा करू शकतात, बिल भरू शकतात आणि इतर बँकिंग व्यवहार करू शकतात. बिल भरण्यासाठी आणि पैसा पाठविण्यासाठी ऍप्स वापरू होऊ लागला. इतकेच नव्हेतर अगदी रस्त्यावर छोट्या दुकानदारांनाही १०० रुपयांपेक्षा कमी पेमेंट करू शकता. त्यामुळे कागदी चलन वापर कमी होऊन डिजिटल व्यवहार वाढला आहे. सोशल मीडिया आणि मेसेजिंग ऍप्समुळे पत्रव्यवहाराचा वापर कमी झाला आहे. लोक आता त्वरित संवाद साधण्यासाठी आणि मजकूर, फोटो आणि व्हिडिओ सामायिक करण्यासाठी स्मार्टफोन वापरतात. अनेक उत्पादक कंपन्याचे ऍप्स आणि टूल्स स्मार्टफोनवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे ऑनलाइन शॉपिंग खूप सोयीस्कर झाले आहे. आपण कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणाहून वस्तू खरेदी करू शकतो. म्युझिक प्लेयर, नेव्हिगेशन सिस्टम, गेमिंग प्लॅटफॉर्म आणि बरेच काही या स्मार्टफोनने जगात आणले. पण, स्मार्टफोनचा जास्त अतिवापर करू नका. ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या, तणाव आणि झोपेची कमतरता यासारख्या आरोग्य समस्यांशी संबंधित आजार होतील. स्मार्टफोन तंत्रज्ञानाने इलेक्ट्रॉनिक्स जगाचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले आहे. यामुळे अनेक फायदे झाले आहेत. काही आव्हाने देखील आहेत.त्यामुळे डिजिटल साक्षर होऊन सजग राहा आणि भविष्यात, येणाऱ्या अत्याधुनिक स्मार्टफोनचा चांगल्या कामासाठी वापर करा.