शॉर्ट लिंक ठरतेय युनिक आणि फ्रेंडली
आजच्या डिजिटल युगात, आपण दररोज अनेक वेबसाईटला भेट देतो. या वेबच्या लिंक म्हणजेच युआरएल नेहमीच लांब आणि गुंतागुंतीचे असतात. यामुळे त्यांना लक्षात ठेवणे किंवा इतर लोकांना सांगणे कठीण होते. येथेच शॉर्ट लिंकची भूमिका महत्त्वाची बनते. शॉर्ट लिंक म्हणजे एक लहान, सोपे आणि आठवण ठेवण्यास सुलभ असे युआरएल.
युआरएल म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. इंटरनेटची सुरुवात झाली तेव्हा वेबपेजला कोणतेही विशिष्ट पत्ते नव्हते. सर्वसाधारणपणे, फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल (एफटीपी) वापरून फाइल्स शेअर केल्या जायच्या. त्यानंतर हायपरटेक्स्टची संकल्पना आली. यामुळे एका दस्तऐवजातून दुसऱ्या दस्तऐवजात जाण्याची सोय झाली. पण, या दस्तऐवजांनाही कोणतेही विशिष्ट नाव नव्हते. टिम बर्नर्स-लीने वर्ल्ड वाइड वेब (डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू ) चा विकास सुरू केला. त्यांनीच युआरएल ची संकल्पना विकसित केली.
युआरएलमुळे वेबवरील माहिती सुलभपणे सापडते आणि त्याचा उपयोग विविध एप्समध्ये, वेबसाइट्स, ई-कॉमर्स, सोशल मीडिया इत्यादीमध्ये केला जातो. या युआरएल मध्ये प्रोटोकॉल (एचटीटीपीएस), डोमेन नाव: (उदा. देशोन्नती डॉट कॉम), पाथ: (उदा. महाराष्ट्र, राष्ट्रीय) आणि क्वेरी स्ट्रिंग: (उदा. ?आयडी=123) म्हणजेच ही लिंक इंग्रजीत https://deshonnati.com/maharashtra-pune-helicopter-crash?id=123 अशी तयार होईल. पण इतकी मोठी लिंक लक्षात ठेवणे अनेकदा कठीण जाते. शिवाय ती शेअर करण्यासाठी जागा जास्त लागते. त्यासाठी शॉर्ट लिंकचा वापर केला जातो. ट्विटर, फेसबुक इत्यादी सामाजिक माध्यमांवरील मर्यादित अक्षरांच्या मर्यादेत, शॉर्ट लिंक अधिक प्रभावीपणे वापरले जाऊ शकतात. शॉर्ट लिंकमुळे आपल्याला कोणत्या लिंकवर किती क्लिक्स होत आहेत हे मोजण्याची व्यवस्था आहे. आपण आपल्या स्वतःच्या डोमेन नावाचा वापर करून ब्रँडेड शॉर्ट लिंक तयार करू शकतो. शॉर्ट लिंक मोबाईल डिव्हाइसेसवर अधिक चांगले कार्य करण्यासाठी मोबाईल-फ्रेंडली आहे.
अशा शॉर्ट लिंक तयार करण्यासाठी अनेक ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत. बिटली, टिनीयूआरएल, रीब्रांडली आणि यासारख्या अनेक प्लॅटफॉर्मवर लांब युआरएल शॉर्ट करता येतो. त्यासाठी लिंक कॉपी करून पेस्ट करावा लागतो आणि एक अनन्य शॉर्ट लिंक तयार केला जातो. ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्म्सवर कॅरॅक्टर लिमिट असते. अशा ठिकाणी या शॉर्ट लिंक उपयोगी पडतात. शॉर्ट लिंक वेब पेज, ब्लॉग पोस्ट, व्हिडिओ इत्यादी सामाजिक माध्यमांवर सहजपणे शेअर करण्यासाठी वापरले जातात. ईमेल कॅम्पेनमध्ये लांब लिंकच्या ऐवजी शॉर्ट लिंक वापरणे अधिक प्रभावी असते. शॉर्ट लिंक एसएमएस, क्यू आर कोड इत्यादीद्वारे वापरले जाऊ शकतात. शॉर्ट लिंक एक प्रभावी माध्यम आहे जे आपल्याला वेब पेज सामाजिक करण्याची, मोजमाप करण्याची आणि ब्रँडिंग करण्याची सोयीस्कर पद्धत प्रदान करते. आजच्या डिजिटल युगात, शॉर्ट लिंक प्रत्येक व्यक्ती आणि व्यवसायासाठी आवश्यक बनले आहेत.
Smit digital media app
Smit digital media review
Smit digital media app download
Smit digital media app apk
Digital Media major
Digital media examples
Digital media pdf
Digital media meaning
Digital media project PDF
Digital media course
Digital media definition and examples
Digital Media jobs