गुगल ऍडसेंन्सच्या नियमात \”हा\” मोठा बदल

\"\"

गुगुल ऍडसेंन्सवर आपला अकाउंट आहे. आपण ब्लॉग, न्यूज वेबसाईट किंवा युट्युब चालविता आणि त्यातून तुम्हाला कमाई होत असेल तर ही बातमी नक्की वाचा.

किमान 24 टक्के कर द्यावा लागणार

गुगल हे या वर्षाअखेरीस अमेरिकेबाहेरील निर्माणकर्त्यांच्या पेमेंटवर अमेरिकेमधील कर जून 2021 पासून लागू करणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी युट्युबने सर्व सदस्यांना एका मेलद्वारे संपर्क साधला आहे. युट्युबच्या सदस्यांना कोणतेही कर लागू होत असल्यास ती रक्कम वजा करण्याची योग्य रक्कम ठरवण्यासाठी, आगामी काही आठवड्यात ऍडसेन्स खात्यामध्ये तुमची करविषयक खरी माहिती भरायला सांगण्यात येत आहे. जर 31 मे 2021 पर्यंत कर माहिती पुरवली नाही तर, हे तुमच्या जगभरातील एकूण कमाईच्या 24% वजा करेल.

पण सर्वानी घाबरून जाण्याची गरज नाही. सोशल मिडीया साईट्‌समध्ये गुगल सर्च इंजिनच्या खालोखाल सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या युट्युबने आता त्यांच्याकडे नोंद असलेल्या सदस्यांना युट्युबकडून देण्यात येत असलेल्या कमाईवर अमेरिकन नियमाप्रमाणे प्राप्तीकर लागू करण्याचे ठरवले आहे. जर 31 मे 2021 पर्यंत युट्युबच्या सदस्यांनी (वाहिन्या/कंपन्या अथवा व्यक्तीगत) त्यांची करविषयक माहिती दिली नाही, तर करपात्र सदस्यांना अमेरिकन कर नियमावलीनुसार किमान 24 टक्के कर द्यावा लागणार आहे. हा निर्णय केवळ युट्युबरसाठी आहे. आपल्या news वेबसाईट ला गुगल जाहिराती कश्या लावायच्या, याची माहिती हवी असल्यास ९०२२५७६५२९ संपर्क साधू शकता.

पुढील काही आठवड्यात युट्युबच्या सदस्यांना करविषयक माहिती सादर करण्यासाठी एक ईमेल पाठवला जाईल. ऍडसेन्समधील “ऑनलाइन कर टूल’ म्हणजे सहा पायऱ्या आहेत आणि या प्रक्रियेदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी प्रश्नांच्या काही मालिका असेल. त्यामुळे अमेरिकेमधील कोणतेही कर लागू होत असल्यास, ओळखता येतील. या बदलांच्या आणि गोळा करायच्या कर माहिती सूचीसाठी अधिक माहितीकरिता आमच्या मदत केंद्र याला भेट द्या. असे त्यात नमूद असेल.

अमेरिकेतील करपद्धतीच्या अंतर्गत प्राप्ती कोडच्या अनुच्छेद 3 अंतर्गत अमेरिकेबाहेरील सर्व प्राप्ती करणाऱ्या निर्माणकर्त्यांकडून कर माहिती गोळा करणे आणि ते जेव्हा अमेरिकेमधील दर्शकांकडून काही रक्कम कमावतात, अशा काही प्रकरणांमध्ये कर वजा करणे ही गुगलची जबाबदारी आहे. म्हणूनच अमेरिकेबाहेरील क्रिएटर्ससाठी, कंपनी त्यांच्या सेवा व अटींमध्ये लवकरच बदल करणार आहे. या बदलांमुळे तुमच्या युट्युबवरून केलेल्या कमाईला अमेरिकेमधील कराच्या दृष्टिकोनातून मानधन मानले जाईल. यामुळे तुमच्या कमाईवर कर कसा लागू केला जातो. या पद्धतीवर परिणाम होऊ शकतो आणि अमेरिकी कायद्याच्या आवश्‍यकतेनुसार हा कर गुगल वजा करेल.

एखाद्या क्रिएटरने गेल्या महिन्यात काही डॉलर्स कमावले आणि ते अमेरिकन प्रेक्षकांमधून जनरेट केले असतील, तर तीन शक्‍यता असू शकतात…
1. जर क्रिएटरने टॅक्‍सची माहिती दिली नाही तर 24 टक्के वजावट, खाते बंद
2. क्रिएटर टॅक्‍सची माहिती दिली असेल तर फायनल डिडक्‍शन 15 टक्के वजावट (भारत आणि अमेरिकेमध्ये “कर देवाण-घेवाण करार’ आहे.)
3. क्रिएटरने जर टॅक्‍सची माहिती दिली पण तो देश आणि अमेरिकेत “कर देवाण-घेवाण करार’ नसेल तर 30 टक्के वजावट

काव्यशिल्प डिजिटल निर्मित

काव्यशिल्प डिजिटल निर्मित अनेक न्यूज वेबसाईट वर अधिकृतरित्या गुगल ऍडसेन्स जाहिराती असून, आमच्या अनेक ग्राहकांना मोठी कमाई सुरु आहे.


Clik Here

Verified by MonsterInsights