वर्डप्रेस मध्ये नवीन पोस्ट कशी करावी?
सर्व प्रथम लॉगिन करावे?
आपल्या वेबसाईट लिंकच्या पुढे wp-admin शब्दप्रयोग असेल. या लिंकवर क्लिक करावे. युझरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे
WordPress Dashboard
login केल्यानंतर डॅशबोर्ड दिसेल- त्याखाली All Post/All page/ Media आहेत. मोबाईल वरून बातमी पोस्ट करताना काही वेगळे फीचर्स दिसतील. + चिन्ह वरती दिसेल. तिथेही क्लीक करून नवीन पोस्ट करता येईल . All Post वर क्लीक करून Add New बातमी Post च्या ऑप्शनला जावे.
New Post
New Post मध्ये गेल्यावर Add tittle मध्ये बातमीची हेडिंग टाकावी. त्याखालील मोठ्या रकान्यात बातमी किंवा मजकूर लिहावा. ( संगणकावर उजव्या कोपऱ्यात, मोबाईल वर बातमीच्या खाली) कॅटेगरी मध्ये बातमीच्या विषयानुसार शहर किंवा कॅटेगरी निवडावी. मग बातमीचा फोटो घेण्यासाठी Featured Image यावर क्लीक करावे. फोटो ऍड झाल्यावर पब्लिश बटन क्लीक करून पोस्ट करावी.
Share Post
आपली बातमी पोस्ट झाल्यावर हेडिंगच्या वर veiw पोस्ट वर केल्यास पोस्टची लिंक उघडेल. वाचकांना ही पोस्ट याप्रमाणे दिसेल. जर ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करायची असेल तर बातमीच्या खाली सोशल मीङिया बटण राहील. फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, व्हाट्सअप वर क्लिक करून बातमी शेअर करता येईल.
Best Service
वेबसाईट डेव्हलपरच्या कौशल्यानुसार हे फीचर्स असतात. अशा प्रकारची सोपी आणि सुलभ पद्धत काव्यशिल्प डिजिटल मीडियाने आपल्या ग्राहकांना दिली आहे.