Webinar on Digital Media Ethics Code-Western Region PIB.
भारत सरकारने विविध समाज माध्यम मंचाचा वापर करणाऱ्या सामान्य जनांच्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित साहित्यविषयक तक्रारींचे निवारण करणे तसेच त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य व्हावे यासाठी 25 फेब्रुवारी 2021 पासून नवे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि माध्यमांसाठी आचार संहिता) नियम 2021 अधिसूचित केले आहेत ,हे तुम्हांला माहितच आहे.
आचारसंहिता आणि डिजिटल माध्यमांशी संबंधित प्रक्रिया आणि सुरक्षा यंत्रणा यांच्याशी संबंधित असलेला नियमांचा तिसरा भाग केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत लागू केला जात आहे.
या संदर्भात, पत्र सूचना कार्यालयाने डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेची अंमलबजावणी आणि त्यासंदर्भातील तर्कसंगत विचार याबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देण्यासाठी मुख्य वक्ते म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह-सचिव विक्रम सहाय यांचे मार्गदर्शन-