समुदायामधील सदस्यांकरिता एकमेकांना शोधणे आणि एकमेकांशी कनेक्ट करणे आणखी सोपे करण्यासाठी येत्या आठवड्यांमध्ये YouTube हे हँडल सादर करणार आहे. तुमचे हँडल हे तुमच्या चॅनलसाठी युनिक असेल आणि टिप्पण्या, समुदाय पोस्ट व आणखी बऱ्याच ठिकाणी तुमचा उल्लेख करण्याकरिता लोक तुमचे हँडल वापरतील.
YouTube will gradually introduce the option to select a handle for each channel in the upcoming weeks. Eligible users have already started receiving an email and a notification in YouTube Studio. Usually, if they already have a unique URL for their channel, YouTube reserves it as their handle.
तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे:
आम्ही येत्या आठवड्यांमध्ये सर्व चॅनलसाठी हँडल निवडण्याची क्षमता हळूहळू रोल आउट करत आहोत आणि तुमचे हँडल तुम्ही निवडू शकाल, तेव्हा तुम्हाला दुसरा ईमेल व YouTube Studio मध्ये सूचना मिळेल. तुमच्या चॅनलसाठी तुमच्याकडे पर्सनलाइझ केलेली URL आधीपासून असल्यास, बहुतांश बाबतींमध्ये आम्ही ती तुमचे हँडल म्हणून तुमच्याकरिता आरक्षित केली आहे. आम्ही आरक्षित केलेल्या हँडलपेक्षा वेगळे हँडल तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते बदलू शकता. आज तुमच्याकडे पर्सनलाइझ केलेली URL आधीपासून नसल्यास, तुम्हालादेखील तुमच्या चॅनलसाठी हँडल निवडता येईल.
१४ नोव्हेंबर २०२२ पासून, तुमच्या चॅनलसाठी तुम्ही अद्याप हँडल निवडले नसल्यास, YouTube हे तुम्हाला एखादे हँडल आपोआप असाइन करेल आणि हवे असल्यास, तुम्ही ते YouTube Studio मध्ये बदलू शकाल.