a pile of keys sitting on top of a table

पासवर्ड म्हणजे डिजिटल सुरक्षा कवच

आपण आपल्या घराबाहेर पडतो, तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव कुलूप लावून जातो. प्रवास करताना साहित्य किंवा बॅग जपून सुरक्षित ठेवतो. वाहने देखील लॉक करून पार्क करतो. म्हणजेच काय महत्वपूर्ण वस्तू आपण चोरांपासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. आजच्या डिजिटल युगात, आपले जीवन ऑनलाइन जगासोबत गुंतलेले आहे. ऑनलाइन जगात देखील चोरटे अर्थात हॅकर्स मोठ्या प्रमाणात वावरत असतात. व्यवहारिक जीवनामध्ये जसे कुलूप महत्त्वाचे आहे, तसे ऑनलाइन जगामध्ये पासवर्ड महत्त्वाचे आहे. आपल्या डिजिटल संपत्तीचे रक्षण करण्यासाठी कोणालाही सहज लक्षात येणार नाही, असा पासवर्ड वापरणे आवश्यक आहे.

आज आपण ऑनलाइन बँकिंग, सोशल मीडिया, ई-कॉमर्स आणि इतर अनेक सेवा घेतो. विविध एप किंवा वेबसाईटवर लॉगिन करतो. त्यासाठी आपल्याला अकाउंट क्रिएट करावे लागते. त्यासाठी पासवर्ड तयार करताना अनेकदा सोपे आणि सहज आठवण राहिल, असा अक्षर किंवा आकडे देतो. पण, हीच चूक आपल्याला महागात पडते.  ईमेल, ऑनलाईन बँकिंग, फेसबुक – इन्स्टाग्राम – ट्विटरसारखा सोशल मीडिया किंवा मग शॉपिंग एप्ससाठी एक पासवर्ड ठेवावा लागतो. आणि तो लक्षातही ठेवावा लागतो, म्हणून मग अनेकदा आपण शॉर्टकट्स मारतो. हीच गोष्ट धोकादायक ठरू शकते.

पासवर्ड हा आपल्या डिजिटल आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ऑनलाईन संपत्ती सुरक्षित ठेवायची असेल, तर चोरट्याना तो सापडू नये असा असावा.  पासवर्ड हा एक अक्षर, संख्या आणि विशेष चिन्हांचा असावा. जो आपल्याला आपल्या ऑनलाइन खात्यात प्रवेश करण्यास मदत करतो. पासवर्ड आपल्या वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती आणि इतर गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. पासवर्ड आपल्या खात्यात अनधिकृत प्रवेश रोखतात. मजबूत पासवर्ड आपल्याला आपल्या ऑनलाइन खात्यांवर अधिक विश्वास ठेवण्यास मदत करतात. आपले पासवर्ड नियमितपणे बदलत असावा. विशेषतः जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे खाते कोणत्याही प्रकारे धोक्यात आले आहे, तेव्हा वेळीच ते बदला. टु स्टेप व्हेरिफिकेशन ठेवल्यास तुमच्या खात्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला मोबाईलद्वारे परवानगी द्यावी लागते. त्यामुळे चोरटे प्रवेश करू शकत नाही. या पासवर्डमुळे आपल्या स्मार्टफोनमध्ये सहजपणे कोणी डोकावू शकत नाही अथवा त्यामधील इतर माहितीही आपण स्वत: तो उघडून दिल्याशिवाय कुणालाही पाहता येत नाही. म्हणजे हा पासवर्ड आपल्या स्मार्टफोनसाठी एक प्रकारे आपल्या वैयक्तिक पहारेकऱ्याचे काम करतो. त्यासाठी मजबूत पासवर्ड तयार करावा. लहान शब्दांच्या ऐवजी अक्षरे, संख्या आणि विशेष चिन्हे यांचे मिश्रण वापरा. पासवर्ड किमान 8-12 अक्षरांचा असला पाहिजे. सामान्य शब्द, जन्मदिवस किंवा फोन नंबर यांचा वापर करू नका. फिशिंग इ-मेल आणि मोबाईल संदेश लिंकपासून सावध रहा. .वेळोवेळी आपला पासवर्ड डेटा लीक झाला आहे का याची तपासणी करा. पासवर्ड व्यवस्थापक टूलचा वापर करून आपले सर्व पासवर्ड सुरक्षितपणे संग्रहित करा.  पासवर्ड मॅनेजर तुमच्यासाठी नवीन युनिक पासवर्ड तयार करेल आणि हे पासवर्ड्स सुरक्षितही ठेवेल. यानंतर तुम्हाला एखाद्या अकाऊंटमध्ये लॉग इन करताना या पासवर्ड मॅनेजरच्या मदतीने लॉग इन करता येईल. या पासवर्ड मॅनेजरचा फायदा म्हणजे दर वेळी नवा – वेगळा पासवर्ड तयार करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार नाही. शिवाय तुमचे यापूर्वी तुम्ही ठरवलेले काही पासवर्ड सुरक्षित नसतील, तर तशी सूचनाही पासवर्ड मॅनेजर तुम्हाला देईल. सार्वजनिक ठिकाणी वायफाय नेटवर्कवर संवेदनशील माहिती देऊ नका. आपल्या डिव्हाइस आणि सॉफ्टवेअरला नेहमी अपडेट करा, जेणेकरून तुमची माहिती चोरी जाणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights