social media, facebook, smartphone

मैत्रीचा धागा विणणारा फेसबुक

काळाच्या ओघात माणसे दुरावली होती. बालपणीचे मित्र नोकरीच्या निमित्ताने दूर गेले. कुटुंब कुटुंबापासून विभक्त झाले. संवाद हरवला होता. सध्या तो काय करतोय याचा थांगपत्ता नव्हता. परंतु फेसबुकने हा दुरावा दूर केलेला आहे. इतकेच काय तर कधीही न बघितलेल्या, ओळख नसलेल्या आणि संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत देखील मैत्रीचा धागा फेसबुकच्या माध्यमातून विणला गेला.

4 फेब्रुवारी 2004 रोजी, मार्क झुकरबर्ग आणि त्याच्या मित्रांनी हार्वर्ड विद्यापीठात “दफेसबुक” नावाची एक नेटवर्किंग साइट तयार केली. सुरुवातीला, ही साइट फक्त हार्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होती. पुढे ती इतर विद्यापीठे आणि जगभरातील लोकांसाठी खुली झाली. 2005 मध्ये,  करण्यात आले. (Facebook)

फेसबुकने जगाला जवळ आणले आहे. जगभरातील लोकांशी संपर्कात राहणे सोपे झाले आहे. फेसबुक हे केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही तर माहितीचा आणि ज्ञानाचा खजिना बनला. जगभरात काय चालले आहे याची माहिती फेसबुकद्वारे मिळते.

या फेसबुकच्या माध्यमातून अनेक जण आपापल्या जीवनातील क्षण, विचार आणि संदेश पोस्ट करीत असतात. फोटोच्या माध्यमातूनही जीवनातील अनेक आठवणी आणि माहिती जगापुढे उलगडतात. मित्रांचे वाढदिवस या निमित्ताने फेसबुकच्या माध्यमातून साजरे करता येतात. प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्यासाठी (Facebook) लाईव्ह करता येतो.

फेसबुक सतत विकसित होत आहे आणि नवीन वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता सादर करत आहे. भविष्यात, फेसबुक आणखी व्हर्च्युअल रियलिटी आणि ऑगमेंटेड रियलिटी सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करेल, अशी अपेक्षा आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने फेसबुक अधिक आकर्षक बनले आहे. फेसबुक वरून कमाई करण्याचे काही मार्गदेखील आहेत. त्यासाठी फेसबुक पेजवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. व्हिडिओ, ऑडिओ, लाइव्ह प्रसारण, पोस्ट आणि इतर सामग्रीवर प्रेक्षक तुम्हाला “Stars” पाठवून पैसे देऊ शकतात. आपल्या व्यवसायाची जाहिरात आपण पेजवरून बूस्ट करू शकतो. जेणेकरून आपल्याला पाहिजे त्या परिसरात व्यवसाय किंवा प्रसिद्धी मिळविता येते. तुम्ही तुमच्या ज्ञान आणि कौशल्यांचा उपयोग करून फेसबुक लाइव्हद्वारे लोकांना शिकवू शकता आणि पैसे कमवू शकता.

(Facebook) फेसबुकचा जगावर अनेक प्रकारे सकारात्मक परिणाम झाला आहे. लोकांना जगभरातील लोकांशी संपर्कात राहण्यास, माहिती आणि बातम्या शेअर करण्यास आणि व्यवसायांना वाढण्यास मदत केली आहे. फेसबुकने शिक्षण आणि संशोधनासाठी नवीन संधी देखील निर्माण केल्या आहेत.

तथापि, फेसबुकचे काही तोटे देखील आहेत. फेसबुकशी संबंधित काही आव्हाने देखील आहेत, जसे की खोट्या बातम्यांचा प्रसार, डेटा गोपनीयता आणि व्यसन. फेसबुकच्या अतिवापरामुळे व्यसन होऊ शकते आणि वास्तविक जीवनाकडे दुर्लक्ष होऊ शकते. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्यासाठी फेसबुकचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे फेसबुकचा वापर विवेकपूर्णपणे करणे आवश्यक आहे.

देवनाथ गंडाटे 
7264982465

डिजिटल मीडिया अभ्यासक

(Facebook’s Mark Zuckerberg’s beats Tesla CEO Elon Musk in this ‘rich list’ for the first time since 2020)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights