२००६ मध्ये ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी, नोआह ग्लास, बिझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांनी सुरुवातीला ट्विटरचा वापर कंपनीतील संवादासाठी केला. मजकूर संदेशांचा वापर करून संवाद साधत होते. त्यानंतर ते सर्व लोकांसाठी खुले करण्यात आले. पण, आता हे ट्विटर एक्स नावाने ओळखू लागले आहे. एलोन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांनी अनेक बदल घडवून आणण्याची योजना आखली. त्यामुळे वाद विवाद निर्माण झाले. या वादांमुळे, मस्क यांनी ट्विटरऐवजी एक्स असे नामकरण केले.
ट्विटर एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून तेव्हा उदयाला आले तेव्हा अभिनेता अश्टन कचर हा पहिला ट्विटर युजर ठरला, ज्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यानंतर विविध कार्यक्रम, सभा, राजकीय सभा यांच्यासाठी ट्विटरचा वापर संवादाचं एक माध्यम म्हणून करण्यास सुरूवात झाली. आज राजकीय, सामाजिक, अभिनय आणि माध्यम क्षेत्रातील लोक याच सोशल मीडियावर सर्वप्रथम पोस्ट करतात. आजच्या सोशल मीडियाच्या जगात, एक्स (ट्विटर) हे सेलिब्रिटींसाठी चाहत्यांना जोडण्यासाठी आणि स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक अत्यंत लोकप्रिय व्यासपीठ बनले आहे. अनेक सेलिब्रिटी दररोज ट्विट करतात आणि लाखो फॉलोअर्स त्यांच्या प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवितात. राजकारणी, खेळाडू, कलाकार ट्विटरवर आहेत. त्यांना ट्विटरवर फॉलो करु शकता. या व्यक्ती काय विचार करतात? त्यांच्या कामातील अपडेट्स काय आहेत? त्याचं खासगी आणि सार्वजनिक आयुष्य कसं सुरु आहे? एखाद्या विषयावर त्यांचे मत काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे थेट त्यांच्याकडूनच आपल्याला ट्विटरवरुन शक्य होते.
ट्विटर हे उत्पन्नाचे एक महत्त्वाचे स्त्रोत आहे. ते प्रायोजित ट्विट्स आणि जाहिरातीद्वारे पैसे कमवू शकतात. ट्विटरवर लाखो फॉलोअर्स असलेले सेलिब्रिटी आपल्या ब्रँडची मार्केटिंग करतात. ट्विटर हे सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर मत व्यक्त करण्यासाठी आणि सामाजिक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ आहे. अनेक सेलिब्रिटींनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावीपणे वापर केला जात आहे. ट्विटरने ट्रेंडिंग टॉपिक्स आणि हॅशटॅग सारख्या वैशिष्ट्यांची सुविधा करून दिली आहे. त्यामुळे जगभरातील घडामोडी अधिक प्रभावीपणे शेअर होण्यास मदत झाली आहे.