smartphone, hand, keep

मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच जोडणारा ब्लूटूथ

मोबाइल फोन, लॅपटॉप, संगणक, प्रिंटर, डिजिटल कॅमेरा, डिजिटल स्पीकर, माईक, हेडफोन, नवीन बाईक, कार, वीडियो गेम, सिलिंग फॅन, कुलर, लाईट आदी साधनात दोन उपकरणांना जोडण्यासाठी रेडियो तरंगचा वापर होतो. ज्याला ब्लुटूथ अशी ओळख आहे. आज प्रत्येकजण माहिती आणि फाईल देवाणघेवाणीसाठी ब्लूटूथचा वापर करीत आहे.

ब्लूटूथ हे नाव मध्ययुगीन स्कॅन्डिनेव्हियन राजा हॅराल्ड ब्लूटूथ गोर्मसन यांच्या नावावरून देण्यात आले. ते कंपनी सन 958 ते 986 पर्यंत डेन्मार्कचे राजा होते. अनेकांना प्रश्न पडतो की, ब्लूटूथच्या मालकाने या तंत्रज्ञानाचे नाव त्या राजाच्या नावावर का ठेवले? राजा हॅराल्ड ब्लूटूथ गोर्मसन यांनी नॉर्वे आणि इंग्लंडचा काही भाग अर्थात डेन्मार्क जिंकून स्कॅंडिनेव्हियन देशांना एकत्रित केले. दुसरं म्हणजे, राजाचा एक दात रंग गडद निळा/राखाडी होता. त्यामुळे त्याला ब्लूटूथ या टोपणनावाने ओळखले जाऊ लागले. राजा हेराल्ड ब्लूटूथने दोन राज्यांना जोडले. यामुळे ब्लूटूथ तयार करणाऱ्या टीमचे सदस्य जिम कार्डेक यांनी त्या तंत्रज्ञानासाठी ब्लूटूथचे नाव सुचवले. जे सर्वांना आवडले, त्यानंतर त्या तंत्रज्ञानाचे नाव ब्लूटूथ ठेवण्यात आले. डिजिटल युगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांना देवाणघेवाणीसाठी जोडण्याचे काम ब्लूटूथ करीत आहे. ब्लूटूथ हे एक लहान-श्रेणीचे वायरलेस तंत्रज्ञान मानक आहे. ज्याचा वापर मोबाईल उपकरणांमधील डेटाची देवाणघेवाण कमी अंतरावरील आणि वैयक्तिक क्षेत्र नेटवर्क तयार करण्यासाठी केला जातो.

ब्लूटूथचा जन्म 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला झाला होता, केबल आणि वायरशिवाय मोबाइल उपकरणांना कनेक्ट करू शकेल,अशा तंत्रज्ञानाचा विकास करण्याचा प्रयत्न इंजिनिअर आणि शास्त्रज्ञांनी केला. आज, ब्लूटूथ हे स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, स्पीकर, हेडफोन आणि स्मार्टवॉचसह विविध प्रकारच्या उपकरणांमध्ये वापरले जाते. हे वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी एक लोकप्रिय साधन बनले आहे. कारण ते वापरण्यास सोपे आहे,

आजकाल ब्लूटूथ हे सर्व फोनमध्ये असते आणि बरेच जण रोज त्याचा वापर सुद्धा करतात. स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ हे ऑप्शन देण्यात आलं आहे. एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये फाईल ट्रान्सफर करण्यासाठी, व्हिडीओ, गाणी ऐकण्यासाठी ब्लूटूथचा वापर होतो. म्हणून आता अनेकांकडे वायर्ड इअरफोन्सच्या जागी ब्लूटूथ पाहायला मिळतात.

ब्लूटूथ तंत्रज्ञानामुळे हल्ली लॅपटॉपपासून ते स्मार्टवॉचपर्यंत सर्व डिव्हाइस एकत्र लिंक करणे अतिशय सोपे झाले आहे. मात्र ब्लूटूथमुळे होणारे संभाव्य धोके प्रत्येकाने समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमचा व्यक्तिगत डेटा व गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हे धोके समजून घेतल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. ब्लूटूथ पूर्णपणे सुरक्षित नसले तरीही, सावध राहण्यासाठी ब्लूटूथ हेडसेटचा वापर मर्यादित केला पाहिजे. वापरात नसताना हेडसेट, फोन, इतर गॅझेट शरीरापासून दूर ठेवावेट. बिछान्यावर गॅझेट घेऊन झोपू नका. फोन कॉल करण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी, अधिक काळ ऑडिओ ऐकण्यासाठी हेडसेटचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करावा. वापरात नसताना वायरलेस उपकरणे कान किंवा डोक्यातून काढले पाहिजे. सातत्याने ब्लू-टूथ इयरफोन्स वापरल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे काळजी घेऊन वापर करावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights